‘रक्षक’च बनला ‘भक्षक’ ! ‘वॉचमन’नं सायनाइड विषाचा प्रयोग करुन 2 वर्षात घेतला 10 जणांचा ‘जीव’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चौकीदार म्हणून काम करणाऱ्या 38 वर्षीय एका व्यक्तीने पोटॅशियम सायनाइड या घातक विषाचा वापर करुन 10 लोकांची हत्त्या केली. सिरियल किलर प्रकारे व्यवहार करुन या व्यक्तीने 10 हत्या फक्त 2 वर्षात केल्या. हदय हेलावून टाकणारी ही घटना आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील आहे.

पोलिसांनी हा वॉचमनला अटक केली आहे. या वॉचमनचे नाव वेलांकी सिम्हाद्री उर्फ शिवा आहे. याशिवाय त्याच्या 60 वर्षीय साथीदाराला म्हणजेच शेख अमीनुल्ला बाबू उर्फ शंकर याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. हा साथीदार वेलांकीला साइनाइडचा पुरवठा करत होता.

शिवा राइस पुलिंग शिक्क्यांची लालच दाखवून लोकांची फसवणूक करत होता. तो हे शिक्के खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी करत असे. त्यानंतर एकांतात जाऊन प्रसादात साइनाइड मिसळून फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तीची हत्या करत असे. त्यानंतर हत्या केलेल्या व्यक्तीच्या अंगावरचे सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन दोघे पसार होत असतं.

शिवाने अशा शिताफीने हत्या केल्या की पोलिसांना देखील शंका आली नाही. मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना देखील संशय आला नाही. कारण शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम दिसत नव्हती. यामुळे शिवा पोलिसांच्या तावडीत कधी सापडला नाही.

या हत्येचा तेव्हा खुलासा झाला जेव्हा 49 वर्षीय काति नागार्जु यांचा संशयित मृत्यू झाला. ती आपल्या घरातून सोने घेऊन, रोख रक्कम घेऊन बाहेर पडल्या होत्या. या दरम्यान केलेल्या तपासात सीसीटीव्ही व्हेरिफिकेशनमध्ये उघड झाले की शिवा फिरताना दिसत आहे.

जेव्हा पोलिसांना शिवाची चौकशी केली तेव्हा त्याने कबुल केले की त्याने साइनाइड खायला घालून 10 लोकांची हत्या केली. यातून मिळणारी रोख रक्कम आणि सोन्याचा वापर शिवाने चैनीचे जीवन जगण्यासाठी केला.

राइस पुलर, मिश्रधातूपासून तयार केलेला शिक्का असतो. त्यात चुंबकीय शक्तीच्या मदतीने तांदूळ ओढता येतो. याचा वार स्पेस रिसर्च, शटल प्रोग्राम, उपग्रह आणि रॉकेटमध्ये केला जातो. असे देखील म्हणले जाते की याचा वापर परमाणु ऊर्जा संयंत्रात केला जातो. त्यामुळे बाजारात हे महागड्या किंमतीला विकले जाते. त्यामुळे अनेक लोक अफवांचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक केली जाते. शिक्क्याबद्दल सांगितले जाते की हे शिक्क्यात इरिडियम नावाचा धातू असतो, यामुळे शिक्का तांदूळ खेचतो.

Visit : Policenama.com