Water Chestnut | ब्लड शुगर नियंत्रित करण्यात शिंगाडा ठरू शकतो लाभदायक, जाणून घ्या कसा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Water Chestnut | हिवाळ्यात येणारा शिंगाडा (Water Chestnut) खायला चविष्ट तसेच अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवरही फायदेशीर आहे. जुलाब, ताप, निद्रानाश, अशक्तपणा, पोटाचा त्रास, त्वचेशी संबंधित समस्या बरे करण्यासाठी शिंगाडा फायदेशीर आहे. त्याची साल सुद्धा अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.

 

पोषकतत्वांनी युक्त शिंगाडामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन-ए, सी, मँगेनीज, थायामिन, कार्बोहायड्रेट्स, टॅनिन, सायट्रिक अ‍ॅसिड, रिबोफ्लेविन, प्रथिने आणि निकोटिनिक अ‍ॅसिडचे लक्षणीय प्रमाणात असते. शिंगाडाच्या सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. (Water Chestnut)

 

गोड चव आणि थंडावा :
शिंगाडा हे हिवाळ्यात खाल्ले जाणारे जलीय फळ आहे. मधुमेहाच्या रुग्णांना गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. परंतु शिंगाड्याची चव गोड आणि गुण थंड आहे. बहुतेक लोकांना शिंगाडा फळ खायला आवडते. शिंगाडा किंवा त्याच्या पीठाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

अपचनावरही फायदेशीर :
हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात शिंगाडा मिळतो. याच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते, शिवाय आम्लपित्त, अपचन, रक्तक्षय आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांवर देखील प्रभावी आहे. शिंगाडा खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

 

हाडे मजबूत होतात :शिंगाडा सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. याशिवाय गरोदर महिलांसाठी शिंगाडा सेवन करणे फायदेशीर आहे.

 

केव्हा आणि कसे सेवन करावे :
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी डायबिटिज रुग्ण दररोज शिंगाड्याचे सेवन करू शकतात.
शिंगाडा सोलून खाऊ शकता किंवा उकडल्यानंत खाणे फायदेशीर ठरेल. शिंगाड्यात पोटॅशियम जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Water Chestnut | diabetic patient can take water chestnut can be beneficial in controlling blood sugar know how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Control | वाढत्या वजनावर ‘या’ 7 उपायांनी ठेवा नियंत्रण, अन्यथा तुमची होऊ शकते किडनी निकामी

Sudden Weight Loss | जलदगतीने वजन कमी होणे हे ‘या’ 4 गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, जाणून घ्या

Arthritis Cause Cauliflower | फ्लॉवर खाल्ल्याने वाढू शकते युरिक अ‍ॅसिड, हिवाळ्यात होऊ शकतो चालण्या-फिरण्याचा त्रास