धुळे शहरात भर पावसाळ्यात ‘पाणीबाणी’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तीन जलस्रोत असतांना देखील भर पावसाळ्यात धुळेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. धुळे शहराच्या बहुतांश भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. विशेषतः देवपूर भागाला पर्यायी व्यवस्था नसल्यानं देवपूर भागात पाण्याची अवस्था अधिक बिकट आहे.

महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास धुळे शहराला रोज पाणी देऊ अशी वल्गना करणारे महानगर पालिकेत एकहाती सत्ता येऊन देखील आता गप्प का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय.

धुळे शहराला नकाणे, डेडरगांव तलाव या दोन तलावाच्या माध्यमातून तसेच तापी नदी पात्रातून पाणी पुरवठा होतो. सध्या जिल्ह्यातील नद्यांना पूर आलाय, जिल्ह्यातील चार धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पावसाळ्यात तरी किमान एक दिवसाआड पाणी मिळेल ही धुळेकरांची अपेक्षा धुळे महानगरपालिका पूर्ण करू शकत नाही. नकाणे तलाव देखील जवळपास ५० टक्के भरलाय. असं असतांना केवळ नियोजनाचा अभाव, अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे धुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई स्थिती निर्माण करणाऱ्यांवर प्रभारी आयुक्तपदाचा कारभार पाहणारे जिल्हाधिकारी काय कारवाई करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like