Water Drinking Habits | पाणी पिण्याने सुद्धा होऊ शकते का नुकसान? केव्हा, कसे आणि का जाणून घ्या 5 योग्य पध्दती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Water Drinking Habits | कोणत्याही व्यक्तीसाठी पाणी पिणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. ऑटोमध्ये जाताना, बस स्टँडवर उभे असताना, कार्यालयात, बोलताना, जेवताना, पाणी आपण कोणत्याही वेळी पितो. ही एक अशी क्रिया आहे, जी आपण अतिशय सामान्यपणे करत असतो आणि कधी विचारही करत नाही की, पाणी पिण्याची योग्य पद्धत असू शकते का! हाच निष्काळजीपणा केला जातो, यामुळे होणारे नुकसान माहित नसते. (Water Drinking Habits)

 

द योगा इन्स्टीट्यूटच्या डायरेक्टर हंसा जी योगेंद्र यांचे म्हणणे आहे की, मनुष्याच्या शरीरात 60 टक्के पाणी असते, यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत वापरणे अतिशय आवश्यक आहे. हंसा जी योगेंद्र यांनी याबाबत सांगितलेल्या 5 विशेष टिप्स जाणून घेवूयात :

 

कधी पिऊ नये पाणी

1 – जेवणादरम्यान कधीही पाणी पिऊ नका. यामुळे पचनक्रिया बिघडते. त्यामुळे अ‍ॅसिड तयार होते. इतरही अनेक तोटे आहेत.

मग पाणी कधी प्यावे? जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे आणि जेवणानंतर 90 मिनिटांपर्यंत पाणी पिऊ नये.

 

2 – अनेक तज्ञ म्हणतात की जास्त पाणी प्यायल्याने कॅलरीज कमी होतात. यामुळे काही लोक जास्त पाणी पिऊ लागतात. तहान नसतानाही ते पाणी पितात. ती एक सवय होते. हे हानिकारक देखील आहे. तहान लागल्यावरच पाणी प्या. तहान नसताना पाणी प्यायल्याने सोडियमची समस्या उद्भवू शकते, मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे किडनी, रक्तदाब यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. (Water Drinking Habits)

पाणी तेव्हा प्या जेव्हा तहान लागेल

3 – थंडगार पाणी कधीही पिऊ नये. आयुर्वेद सांगतो की, थंडगार पाण्याचा पोटातील अग्नि तत्वावर म्हणजेच उष्णतेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पचनक्रिया बिघडते. हे जरा सविस्तर समजून घेऊया-

जेव्हा आपण सामान्य तापमानाचे पाणी पितो तेव्हा ते पाणी पोटातून 20 मिनिटांत लहान आतड्यात जाते. त्याचप्रमाणे, जेव्हा गरम पाणी पिता तेव्हा ते 7 ते 10 मिनिटात जाते. परंतु जेव्हा तुम्ही थंडगार पाणी पिता तेव्हा ते पोटातच राहते, ते लहान आतड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शरीराला खूप ऊर्जा खर्च करावी लागते.

म्हणूनच थंडगार पाणी पिऊ नये. गरम पाणी पिऊ शकता. विशेषत: आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आइस्क्रीम किंवा इतर थंड पदार्थांचे सेवन कराल तेव्हा लगेच गरम पाणी प्या.

 

4 – आणखी एक मोठी चूक जी सर्वसाधारणपणे लोक करतात आणि ती म्हणजे उभे राहून पाणी पिणे.
असे केल्याने पाणी वेगाने वाहून जाते. यामुळे तुमचे शरीर पाणी शोषू शकत नाही.

त्यामुळे पाणी नेहमी बसून प्यावे. यावेळी शरीर रिलॅक्स असते आणि ते चांगल्या प्रकारे शोषते.

 

5 – बरेच लोक खूप घाईत पाणी पितात. ते ग्लास तोंडाला लावतात आणि गटागट पाणी पितात.
जलदगतीने पाणी प्यायल्याने शरीरातील लाळेमध्ये पाणी मिसळण्यास वेळ मिळत नाही.
त्यामुळे अ‍ॅसिडशी संबंधित समस्या निर्माण होतात.

त्यामुळे घोट-घोट पाणी प्या. यामुळे शरीर पाणी चांगल्या प्रकारे शोषू शकते.

 

Web Title :- Water Drinking Habits | 5 times you shouldnt drink water here are right watar drinking habits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bombay High Court | ‘रात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे विनयभंगच’

Shani Dev | 2022 मध्ये अडीच वर्षानंतर ’शनी’ बदलणार ‘रास’, जाणून घ्या कुणाला सुरू होईल ‘अडीचकी’ आणि ‘साडेसाती’

Bathroom Stroke | हिवाळ्यात येणाऱ्या बाथरूम स्ट्रोकबद्दल तुम्हाला माहिती आहे?, जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी