मोफत महिला प्रवासाला विरोध ; ‘त्या’ महिलेने पकडला केजरीवाल यांचा ‘शर्ट’

दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लगेचच येणाऱ्या विधानसभा निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. आता घरोघरी जाऊन ते लोकांच्या मागण्या ऐकून घेत आहेत.

दक्षिण दिल्लीत त्यांना एका वेगळ्याच परिस्थितीचा समान करावा लागला. केजरीवाल यांनी नुकताच एक निर्णय दिला आहे की यापुढे दिल्लीतील ट्रेन महिलांसाठी मोफत असेल. याच प्रश्नावर केजरीवाल यांना लोकांनी विरोध केला. यावेळी एका महिलेनेतर केजरीवाल यांचा शर्टच पकडला.

दुसरीकडे वीज आणि पाणीच्या किंमती आप सरकारने कमी केल्या असे सांगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना दक्षिण दिल्लीतील जनतेने घेरले. दक्षिण दिल्लीतील हुमायूपर मध्ये जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि महिलांनी मोफत प्रवासाची सुविधा या योजनेवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी केजरीवाल दक्षिण दिल्लीत पोहचले होते, परंतू याच प्रश्नी जनतेने त्यांना घेराव घालत पाणी आणि इतर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर आश्वासन देत केजरीवाल यांनी पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवू असे सांगितले.

याचबरोबर दक्षिण दिल्लीत होत असलेल्या वीज कपातीवर कारवाई करून लवकरच ट्रांसफार्मर लावण्याचे आदेश केजरीवाल यांनी दिले आहेत. लोक पाण्याच्या समस्येमुळे हैराण झाल्याने त्यांनी केजरीवाल यांना घेरले होते. लोकांच्या मते आधीपासून पाण्याची जी समस्या होती तशीच समस्या आज देखील कायम आहे.

यावर केजरीवाल यांनी सांगितले आहे की, ट्यूबवेल लावण्याचे काम सुरु असून येत्या 3 दिवसात पाण्याची समस्या सुटेल. या दरम्यान महिलेने केजरीवाल यांचा शर्ट पकडल्याचे सोशल मिडियावर येताच बराच वादंग पेटला. एका मुख्यमंत्र्याचा शर्ट पकडल्याने यावर आता पुढे काय होणार हे लवकरच कळेल. परंतू असे प्रकार केजरीवाल यांच्या सोबत सारखेच घडत आहेत. लोकसभेच्या प्रचार दरम्यान देखील त्यांना एका व्यक्तीने कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला होता.

Loading...
You might also like