पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी ! भारताच्या वाट्याचं एक थेंबही पाणी PAK मध्ये जाऊ देणार नाही, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताकडून पाकिस्तानकडे जाणार्‍या नद्यांचे पाणी थांबविण्याच्या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पाकिस्तानला दिले जाणारे पाणी बंद करण्याची भारत तयारी करत आहे. केंद्रीय जल उर्जा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी बुधवारी सांगितले की, रावी नदीवर बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाणार नाही आणि ते पाणी भारतामध्ये वापरले जाईल.

बुधवारी केंद्रीय मंत्र्यांनी रावी नदीवर बांधल्या जाणाऱ्या बैराज प्रकल्पाला भेट दिली. गजेंद्रसिंग शेखावत म्हणाले की, बैराज प्रकल्प तयार झाल्यामुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांना पाण्याचा सर्व वाटा मिळेल. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी रंजित सागर धरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. ते म्हणाले की, बैराजचे काम प्रगतीपथावर असून 2022 पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करत बॅरेज बांधण्यात केंद्र सरकारकडून निधीची कमतरता भासणार नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

100 हून अधिक गावांना फायदा :
केंद्रीय मंत्री म्हणाले की, धरणातून सुटलेले पाणी सीमावर्ती भागात दिले जाईल, ज्यामुळे 100 हून अधिक गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. ते म्हणाले की या प्रकल्पांसाठी केंद्र सरकार 86 टक्के निधी देईल. जम्मू-काश्मीरलाही मोठा फायदा होईल. तसेच जम्मू-काश्मीरच्या वाट्यासाठी केंद्र सरकारही निधी पुरवेल आणि पंजाब सरकार बॅरेजच्या 14 टक्के खर्च देईल. एसवायएलच्या मुद्दय़ावर ते म्हणाले की, ही बाब सर्वोच्च न्यायालयात असून सर्वांना कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागेल.

फेसबुक पेज लाईक करा –