कुंजीरवाडीत बेबी कॅनाॅलमध्ये जलपर्णीमुळे पाणी शिरले शेतात

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – कुंजीरवाडी येथे जुन्या बेबी कॅनाॅलमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाहून आल्याने वाहणारे पाणी तुंबल्यामुळे त्यातून मोठी गळती झाली स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा कॅनाॅलला भगदाड पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असते.

हवेली तालुक्यासाठी वरदान ठरलेला बेबी कॅनाॅल आज कुंजीरवाडी मधील शेतकर्यांसाठी मोठा नुकसान दायी ठरला असता तरीही काही शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरले होते. नविन मुठा उजवा कालव्यातून हवेलीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नव्हते हवेली व दौंडचा पश्चिम भाग यासाठी जुना बेबी कॅनाॅलमधून पाणी पुरवठा करण्यात येतो.

आज सकाळी मुंढवा येथील जॅकवेल मधून कॅनाॅलमध्ये पाणी सोडल्यावर कालव्याची साफसफाई झालेली नसल्याने प्रचंड प्रमाणात जलपर्णी पाण्यासह वाहत आली आणी येथील पुलास अडकून पाणी तुंबले.काही वेळाने कॅनाॅलचा भरावावरुन पाणी शेजारच्या शेतात शिरु लागले.स्थानिक शेतकऱ्यांनी तत्परतेने जे सी बीच्या सहाय्याने जलपर्णी काढून पाण्याला मार्ग काढून दिला व भरावावर माती टाकली परंतु जलपर्णी खुप जास्त असल्याने त्या साफ करणे आवश्यक आहे.

यावर पाटबंधारे खात्याचे अधिकारी सुभाष शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की काल रात्री पाऊस झाला त्यांनतर आज सकाळी मुंढवा येथील जॅकवेल मधून कॅनाॅलमध्ये पाणी सोडल्यावर जलपर्णी वाहून आल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला पाटबंधारे खात्याचे पथक जलपर्णी हटविण्याचे काम करत आहे.तसेच नाले सफाईची निवेदा निघालेली आहे लवकरच कामाला सुरुवात होईल.