आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळावे : आमदार महेश लांडगे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, देशाच्या कानाकपोऱ्यातून आलेल्या नागरिकांना  शहराला सध्या होत असलेला पाणी पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे आत्ताच पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्याकडे केली.

[amazon_link asins=’B07B4LNSTP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1cb0fe75-8fc9-11e8-a2a5-01e5801dfe51′]

आमदार महेश लांडगे यांनी पाणी आरक्षणाबाबत घेतलेल्या बैठकीस पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य अभियंता जलसंपदा व सहसचिव संजय वेबसरे, माजी जलसंपदा मंत्री अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते. शहराची भविष्यातील तहान भागविण्यासाठी आत्ताच ठोस उपाय योजना करायला हवी. त्यासाठी पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळणे महत्वाचे आहे, अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी बैठकीत मांडली.

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे.  चिखली येथे बांधण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षण करणे आवश्यक आहे. भविष्यात पिंपरी-चिंचवडकरांना कुठल्याही पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागू नये, यासाठी ही मागणी करण्यात येत असल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे.