खुशखबर ! जलसंपदा विभागात ज्युनिअर इंजिनिअरच्या ५०० जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र जल संसाधन विभागाने ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) गट ब पदासाठी ५०० जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार महाराष्ट्र भरती २०१९ च्या अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. उमेदवार जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती २०१९ नुसार ५०० रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

या पदासाठी १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. २५ जुलै २०१९ या तारखेपासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात.

महत्वपूर्ण तारीखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २५ जुलै २०१९ पासून

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ ऑगस्ट २०१९

रिक्त जागा

ज्युनिअर इंजीनियर (सिव्हिल) – ५०० जागा

पात्रता नियम

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यता प्राप्त महाविद्यालयातून इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला पाहिजे.

पदाच्या सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी लिंक वर क्लिक करा.

वयाची अट – १८ ते ३८ वर्षाच्या दरम्यान

www.mahapariksha.gov.in अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर जाऊन ऑफिशिअल pdf डाउनलोड करा.

पात्रता धारक उमेदवार १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत www.mahapariksha.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त