लातूर:  मांजरा धरणाने मृत पातळी गाठल्याने दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा

लातूर: पोलीसनामा ऑनलाईन

लातूर जिल्ह्यातून १२७ किलोमीटरचा प्रवास करणारी मांजरा नदी आणि नदीवरचं मांजरा धरण लातूरसाठी जीवनदायिनी आहे. दोन वर्षांनतर पुन्हा एकदा लातूरमध्ये भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. मांजरा धरणातील पाणी साठ्याने मृत पातळी गाठल्याने लातूर पाणी समस्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे. लातूरमध्ये आता दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात करण्यात आला होता.२०१६ नंतर धनेगावच्या मांजरा धरणात चांगला पाणीसाठा होता. आता मात्र २२४ दलघमी क्षमता असलेल्या धरणात उपयुक्त साठा संपला असून, आता केवळ ४५ दलघमी पाणी शिल्लक आहे. पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता असल्याने, आता धरणाचा उपयुक्त साठा संपला आहे. कृषी आणि उद्योगाला पुरवणाऱ्या पाण्यासंदर्भात प्रशासन काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d100871f-c6f5-11e8-ae2b-8fc63245b038′]

लातूरच्या महापालिका आयुक्तांनी पाण्यासंदर्भात कडक नियम केला आहे. लातूर शहरात घरे, मोटारगाड्या आणि परिसर साफ करण्यासाठी पाण्याच्या वापरावर बंदी घातली. अशा पाण्याचा वापर करताना कोणी आढळून आल्यास महापालिका कायदेशीर कारवाई करणार आहे. लातूरच्या महापालिका आयुक्तांनी शहरातल्या सर्व नळांना तोट्या बसवून घेण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश न पाळल्यास महापालिका कारवाई करणार आहे.

लातूर एमआयडीसीसोबतच ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा पट्ट्यातील शेतीसाठी एकमेव आधार असलेल्या या पाण्याच्या वापरावरही प्रशचिन्ह निर्माण झालं आहे. मांजरा नदीवर अनेक ठिकाणी बांध आहेत. आता या धरणाने मृतसाठा गाठला आहे. मृतसाठ्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, पण उद्योग आणि शेतीचं पाणी पूर्णत: बंद करावं लागेल.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B07DFPG3NH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16826983-c6f6-11e8-a436-19c927398abb’]