गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वडगांव जलकेंद्र परिसर व चतु:श्रृंगी/एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परिसर येथील विद्युत, पंपींग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी (दि.11) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.12) शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगांव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यपिठ परिसर, कोंढवा बु इत्यादी.

चतु:श्रृंगी/एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर – पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक, किष्किदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा सोसायटी, गुरु गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव,पॉप्लायुलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परीसर.