Pune News : शहरातील ‘या’ भागातील गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील वडगाव, कात्रज व धनकवडी या तीन भागातील पाणीपुरवठा गुरुवार दिनांक 25 फेब्रवारी रोजी बंद असणार आहे. हा पाणीपुरवठा येथील वडगाव जलकेंद्रा मधील विद्यूत दुरुस्तीचे काम असल्याकारणाने बंद असणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी या भागातील पाणीपुरवठा सकाळी कमी दाबाने सुरळीत होणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलानि:सारण विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागामध्ये हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक व परिसर यांचा समावेश आहे.