पुणे शहराचा गुरुवारी दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पंपिंग स्टेशन वरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा २४ जानेवारीला गुरुवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दिली असून दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.