Watermelon For Diabetes | डायबिटीजचे रूग्ण कलिंगड खाऊ शकतात का? जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाइन – Watermelon For Diabetes | मधुमेहाच्या वाढत्या समस्येने लोक हैराण झाले आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetes Patients ) जीवनशैलीसोबतच आहाराचीही काळजी घेतली पाहिजे. ब्लड शुगर (Blood Sugar) वाढण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे अनेकांना माहीत नसते. उन्हाळ्यात भाज्यांबरोबरच फळांमध्येही भरपूर विविधता पाहायला मिळते. अशा हवामानात कलिंगड आणि खरबूज (Watermelon And Muskmelon) विकले जातात; पण अनेकांना ही फळे टाळावी लागतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कलिंगड खाणे फायदेशीर आहे की नाही हे जाणून घेऊया (Watermelon For Diabetes) –

 

मधुमेहाच्या आजारात गोड फळे खाण्यास मनाई आहे. कलिंगड देखील एक गोड फळ आहे. मधुमेहामध्ये गोड फळे खाल्ल्याने साखरेची पातळीही (Sugar Level) वाढते. कलिंगडमध्ये आढळणारे पोषक तत्व कोणत्याही माणसासाठी चांगले असतात. कलिंगडमध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी (Calcium, Iron, Vitamin A And Vitamin C) भरपूर प्रमाणात असते. किडनी, रक्तदाब आणि डोळ्यांसाठी हे खूप फायदेशीर (Beneficial For Kidney, Blood Pressure And Eyes) मानले जाते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी गोड फळांचे सेवन टाळावे. अशा फळांच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. वास्तविक, मधुमेहाच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे खावीत (Watermelon For Diabetes).

 

आता प्रश्न असा येतो की मधुमेहाच्या रुग्णांसाठी कलिंगड खाणे सुरक्षित आहे की नाही. कलिंगडचा विचार केला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 72 आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या (National Center For Biotechnology Information) संशोधकांच्या मते, मधुमेहाचे रुग्ण मर्यादित प्रमाणात कलिंगड खाऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा खूप चांगला नाश्ता आहे.

 

मात्र, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते जास्त प्रमाणात सेवन करणे त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते.
तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा कलिंगड खाऊ शकता. पण ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Watermelon For Diabetes | watermelon for diabetes can diabetic patients eat watermelon know what is the truth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा