‘सायलेंट किलर’ हाय ब्लड प्रेशरला दूर ठेवण्यासाठी खास 7 उपाय ! कधीही वाटणार नाही अटॅकची भीती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जर तुम्हाला हाय ब्लड प्लेशर असेल तर तुम्हाला अनेक आजार होण्याची समस्या असते. हाय ब्लड प्लेशरला सायलेंट किलरही म्हटलं जातं. आज आपण यापासून दूर रहाण्यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत. आजकालची लाईफस्टाईलची अशी आहेत की, तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यात हाय ब्लड प्रेशरसारखा आजार असा आहे की, यामुळं इतर आजारांनाही निमंत्रण दिलं जातं.

1) ताण-तणावापासून दूर रहा – जर तुम्ही तणावात असाल तर शरीरातील हाय ब्लड प्रेशरही वाढतो. कारण ताण-तणावर निर्माण करणाऱ्या हार्मोन्समुळं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते. ओवर इंटींग, पूर्ण झोप नं घेणं, मादक पदार्थांचं सेवनं यामुळंही ही समस्या वाढते.

2) वजन कमी करा – हाय ब्लड प्रेशरची समस्या करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे वजन कमी करणं आहे. कारण वजन जास्त असेल तर रक्तदाबाशी संबंधित आजार होण्याचा जास्त धोका असतो. व्यायाम करणं हाही उत्तम पर्याय आहे.

3) शारीरिक हालचाल – आजकालच्या बैठ्या कामांमुळंही हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते. कारण दिवसभर कॅफेन आणि साखरेचं सेवनही जास्त होतं. यानं वजनही वाढतं. जरी व्यायाम करणं शक्य नसेल तर किमान शारीरिक हालचाली करायला हव्यात.

4) डॉक्टरांनी दिलेलंच औषध घ्या – जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या जाणवली तर मनाने काही औषध घेणं टाळा. डॉक्टरांना भेटून ते देतील तेच औषध घ्या. नाही तर याचा वपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो.

5) खाण्यापिण्यावर नियंत्रण – असंतुलित आहार घेणं टाळून संतुलित आहार घ्या. कारण सर्वात जास्त समस्या या अनियमित जीवनशैली आणि आहारामुळं होतात. तसेच मद्यपान करणंही टाळायला हवं. आहारात फळे, हिरव्या भाज्या, डाळी खाव्यात.

6) प्रोटीनयुक्त आहार -आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त असावेत. यामुळं तुम्ही अनेक आजारापासून दूर राहता. यासाठी अंडी, मासे, चिकन असे पदार्थ खावेत. जर शाकाहारी असाल तर दूध, पनीर, दही, सोयाबीनचं सेवन करावं.

7) तपासणी – रोज कामातून वेळ काढून अधुन मधून हाय ब्लड प्रेशरची तपासणी करणं गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा तरी ही तपासणी करायला हवी. वेळीच आजार लक्षात आला तर उपचार घेता येतो किंवा तुम्ही ती समस्या होण्याच्या मार्गावर असाल तर दूर राहण्यासाठी उपाय करता येतात.