कामात लक्ष लागत नाही तर ‘नो-टेन्शन’, करा ‘हे’ 7 उपाय, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काम करताना अनेकदा आपलं लक्ष विचलित होतं. कामातून लक्ष उडण्यामागची कारणं अनेक असू शकतात. मात्र कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही नक्कीच खालील उपाय करू शकतात.

1) कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं ते मनात नक्की करा. त्यानुसार कामाला लागा. ठरवलेल्या वेळेनुसार काम होत नाही, तोपर्यंत पुढचं काम घेऊ नका.

2) कंटाळा आल्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असेल तर, कामातून लगेचच ब्रेक घ्या.

3) थोडं चालून या किंवा योग साधना करा. यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळेल, ताण कमी होईल.

4) तुमच्या कामासाठी सकारात्मक वातावरण तयार करा. तुमच्या आजूबाजूला लोकं खूप गोंधळ घालत असतील तर तुम्ही जागा बदला. एक अशी शांत जागा निवडा, जी तुम्हाला कामात मदत करेल.

5) काहीवेळा संगीत ऐकल्याने तुमच्या कामात अधिक लक्ष केंद्रित करता येईल.
6) एखादे मोठे काम एकदम करण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळेत विभागून करा. जर काम मध्यावर आले असेल तर थोडावेळ थांबा ब्रेक घ्या, आणि पुन्हा कामाला लागा.

7) तुम्ही करत असलेल्या कामचं मूल्यमापन करा. त्याची नोंद ठेवा.

You might also like