सचिन वाझे प्रकरणाचे IO अनिल शुक्लांची बदली, ज्ञानेंद्र वर्मा NIA चे नवे IGP

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन हत्या या प्रकरणावरून राजकारणात अनेक दिसापासून चर्चेला उधाण आले आहे. तर या प्रकरणाचा तपास करणारे NIA चे विशेष महानिरीक्षक (IGP) अनिल शुक्ला यांची बदली केली गेली आहे. तर यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष महानिरीक्षक (IGP) अनिल शुक्ला यांना मिझोरामला केडरचे अधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे. तर शुक्ला गे मागील ६ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात प्रतिनियुक्तीवर होते. स्फोटक गाडी प्रकरणाआधीच अनिल शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. परंतु त्यांना महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता शुक्ला यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नियमानुसार त्यांची बदली केली आहे असे सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मागील अनेक महिन्यापासून आयजीपी अनिल शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटक गाडी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान आतापर्यंत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, विनायक शिंदे, नरेश गोर व रियाझुद्दीन काझी यांना अटक केली गेली आहे. सचिन वाझेच्या प्रकरणावरून त्यांना अटक केल्यानंतर माजी आयुक्त परमबीर सिंग यांचीही बदली करण्यात आली. त्यानंतर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे गंभीर आरोप केलेल्या पत्रावरून देशमुख यांनी राजीनामा दिला. यानंतर सध्या CBI या प्रकरणाची चौकशी करत आहे