‘चक्रीवादळ’ अंफन अधिक तीव्र, पश्चिम बंगाल सरकार सज्ज

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरातून येणारं अंफन हे चक्रीवादळ अधिक तीव्र झालं असून, ते ओडिशा, पश्मिच बंगालच्या समुद्रकिनाऱ्याला धडकू शकतं अशी शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाने वर्तवली होती. ते अधिक तीव्र होउन पश्चिम बंगालच्या समुद्रालगत असलेल्या जिल्ह्यांत मोठी हानी पोहोचवू शकते असा इशाराही देण्यात आला होता. त्याची दखल घेऊन पश्चिम बंगाल या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज झालं आहे.

पश्चिम बंगलच्या समुद्रालगतच्या जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यांसह अतिप्रचंड पाउस व्हायची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. येथील मच्छिमारांनाही आवश्यक सूचना देण्यात आला असून, समुद्रालगतचा परिसर मोकळा करण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम बंगालच्या सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्याच वेळेत अंफन वादळ आल्याने सरकारला दोन्ही आघाड्यांवर लढावं लागत आहे.