WB Election 2021 : पश्चिम बंगालमध्ये गड आला पण सिंह गेला ! नंदीग्राममध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा पराभव; भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी केला 1957 मतांनी पराभव

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. मात्र, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा शेवटच्या राऊंडमध्ये पराभव झाला आहे. त्यांना भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराजित केलं आहे. मतमोजणीला सुरूवात झाली होती तेव्हा भाजपाचे सुवेंदू अधिकारी हे आघाडीवर होते. त्यानंतर अनेक वेळा ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात काटयाची टक्कर सुरू होती. अखेर ममता बॅनर्जी यांचा भाजपाच्या अधिकारी यांनी 1957 मतांनी पराभव पराभव केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा गतवेळच्या निवडणूकीपेक्षा निश्चितपणे खुप वाढल्या आहेत. पण त्यांना अपेक्षित असलेलं यश भाजपाला मिळालेलं नाही. मात्र, ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून पराभव झाला आहे. तरी देखील पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता येणार आहे. दरम्यान, देशातील अनेक मोठया नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूलच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

दरम्यान, यापुर्वी एनएनआय वृत्तसंस्थेनं ममता बॅनर्जी यांचा 12 मतांनी विजय झाला असं जाहीर केलं होतं मात्र आता स्वतः ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये पराभव झाल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे.