WB Elections : पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 250 कोटी जप्त

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा घमासान सुरु आहे. तृणमुल काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी झुंज येथे पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेत्यांची एकमेकांवर वैयक्तिक टिका करुन वातावरण बिघडू पहात आहेत. अशा वेळीच निवडणुक आयोगाने तपासणी अतिशय कडक केली आहे. तेथे ७ टप्प्यात मतदान होणार असून त्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण होत असतानाच आतापर्यंत २४८ कोटी ९० लाख रुपयांची रोकड तसेच साहित्य जप्त करण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेल्यामध्ये ३७ कोटी ७२ लाखांची रोकड, ९ कोटी ५० लाख रुपयांची दारु आणि ११४ कोटी ४४ लाखांच्या ड्रग्सचा समावेश आहे. पंजाबचे अतिरिक्त मुख्य इलेक्टोरल अधिकारी संजय बसु यांनी ही माहिती दिली. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्च रोजी झाले असून ७९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. दुसर्‍या टप्प्यातील मतदान १ एप्रिल रोजी होणार आहे.