WB Elections Results 2021 : ‘ममता’च्या झंझावातात भाजपच्या स्टार नेत्यांचे ‘पानिपत’; मिथुन चक्रवर्ती यांच्यासह अनेक तारेतारकांची जादु नाही चालली

कोलकत्ता : वृत्तसंस्था – ममता बॅनर्जी यांच्या झंझावाताने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला गेल्या वेळीपेक्षा अधिक जागा यंदा मिळवून दिल्या. त्याचवेळी ममतादिदीला बंगालवासियांनी दिलेल्या पाठिंब्यामध्ये भाजपच्या अनेक स्टार नेत्यांचे पानिपत झाले. नंदीग्राममध्ये सुवेंदु अधिकारी हे फक्त जायंट किलर ठरले. पण ते मुख्यत तृणमूलचे नेते होते. भाजपने केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविले होते. टॉलीगंज मतदारसंघातून बाबुल सुप्रियो यांचा ५० हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे खवळलेल्या सुप्रियो यांनी बंगालच्या जनतेने भाजपला सत्ता न देऊन ऐतिहासिक चुक केली आहे. ममता बॅनर्जी यांना त्याने क्रुर महिला असे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

खासदार लॉकेट चॅटर्जी यांना चुंचडा येथून मोठा पराभव स्वीकारावा लागला. तसेच राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांना तारकेश्वर येथून उमेदवारी दिली होती. त्यांचाही पराभव झाला. भाजपने अनेक अभिनेते, अभिनेत्री यांना रिंगणात उतरविले होते. त्यांचा पराभव झाला. अभिनेत्री पर्णो मित्रा यांना बरानानगरमधून पराभव स्वीकारावा लागला. अभिनेत्री पायल सरकार (बेहला पूर्व), अभिनेता श्रीबेती चॅटर्जी ( बेहला पश्चिम) रुदेल घोष (भवानीपूर), निवृत्त आर्मी अधिकारी सुब्रता सहा (रासबेहारी), फुटबॉलपटू कल्याण चौबे (माणिकताला), अभिनेता पपिया डे (उलेबेरिया दक्षिण), अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती (श्यामपूर), अभिनेता यश दासगुप्ता (चंडीताला), पत्रकार स्वपन दासगुप्ता (तारकेश्वर), माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा (मोयना), फॅशन डियानर अग्नीमित्रा पॉल (असनसोल दक्षिण), इकोनॉमिस्ट अशोक लहिरी (बेलुरघाट), माजी पोलीस अधिकारी भारती घोष (डेबरा), अशा अनेक नामवंत कलावंत, खेळाडु यांना भाजपने रिंगणात उतरविले होते. परंतु, त्यांची डाळ शिजली नाही.

मिथुन चक्रवर्ती यांना भाजपने आपल्याकडे ओढून प्रचारात उतरविले़ लोकांनी सभांना गर्दी केली. परंतु, मत मात्र दिले नाही. आयारामांमुळे पराभवाला हातभार भाजपने तृणमूल काँग्रेस, काँग्रेसमधील अनेकांना पक्षात घेऊन त्यांना थेट उमेदवारी दिली़ त्यातून भाजपचे कार्यकर्ते बिथरले़ मतदारांना हे घाऊक पक्षांतर भावले नाही़ त्यातील एखाद दुसरे आमदार सोडले तर सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला कोरोनाने हरविले निवडणुकीत विजयी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा हे खरदाहा येथून निवडणुक लढवत होते़ २२ एप्रिलला सहाव्या टप्प्यात त्यांच्या मतदार संघाचे मतदान झाले़ त्यानंतर २५ एप्रिलला त्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला़ मतमोजणीत त्यांनी भाजप उमेदवाराचा २० हजार मतांनी पराभव केला.