WB Elections : पश्चिम बंगालमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती !

कोलकत्ता : वृत्त संस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत सर्व २९४ मतदारसंघातील निकाल समोर आले असून त्यात तृणमूल काँग्रेसने बहुमताचा टप्पा पार केला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये तब्बल ७ हजार मतांनी पिछाडीवर पडल्या आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेससाठी ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने आपली सर्व शक्तीपणाला लावली होती. देशभरातील भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, हजारो आमदार यांना पश्चिम बंगालमध्ये अगदी घरोघरी प्रचाराला जुंपले होते. त्यामुळे ही लढत ममता बॅनर्जी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी झाली होती. एक्झिट पोलनुसार सध्या निकाल दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या पहिल्या दोन फेºयांमध्ये तृणमूल काँग्रेसने १८९ जागी आघाडी घेतली आहे.

तर भाजप ९८ जागांवर आघाडीवर आहे़ काँग्रेस आणि डावे हे संपूर्णपणे दूर फेकले गेले आहेत़ दोघांना मिळून केवळ ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. २९४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी २४६ जागा मिळण्याची आवश्यकता आहे़ बहुमताचा हा आकडा तृणमूलने केव्हाच पार केला असून सध्या तृणमूल काँग्रेस १८९ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात पुढील फेर्‍यांच्या मतमोजणी खूप मोठा फेरबदल होत नाही. त्यामुळे सध्यातरी तृणमूल काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळविणार असे चित्र आहे. त्याचवेळी आता सर्व लक्ष नंदीग्राममधील लढतीकडे लागले आहे. नंदीग्राममधून शुभेंदु अधिकारी हे नेहमी ४० टक्के मते अधिक घेऊन निवडून येत असत. मात्र, निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले. हा ममता बॅनर्जी साठी मोठा धक्का होता. त्यातूनच त्यांनी नंदीग्राममध्ये लढण्याची घोषणा केली.