Sarkari Jobs : 2545 पदांसाठी निघाली मेगा भरती, 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार करु शकतील अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पश्चिम बंगाल आरोग्य भरती मंडळाने (West Bengal Health Recruitment Board) जीडीएमओ आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरच्या एकूण 2545 पदांसाठी इच्छुक उमेदवार 29 जूनपर्यंत पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करत असल्याचे निश्चित करून अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार मंडळाच्या अधिकृत वेबसाइट wbhrb.in वर जाऊन या पदांशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

कोणत्या पदासाठी किती जागा –

पश्चिम बंगाल आरोग्य भरती मंडळाद्वारे काढण्यात आलेल्या या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्याची अंतिम तारीख 29 जून आहे. या 2545 पदांपैकी 1371 पदे वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत, तर 1174 पदे जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरसाठी आहेत. अधिकृत अधिसूचनेद्वारे उमेदवारांना दोन्ही पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रताबाबत माहिती मिळू शकते.

वयाची अट –

या पदांसाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. आपण वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 40 वर्षे असेल. त्याच वेळी, जर आपण जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर 1 जानेवारी 2020 रोजी वय 36 पेक्षा जास्त नसावे.

प्रक्रिया –

– उमेदवारांनी 210 रुपये शुल्कासह ऑनलाईन फॉर्म भरावा आणि तो जमा करावा.
– शुल्क शासकीय रिसिप्ट पोर्टल प्रणालीत समाविष्ट कोणत्याही बँकेकडून नेट बँकिंगद्वारे जमा केले जाऊ शकते.
– अधिक माहितीसाठी पश्चिम बंगाल आरोग्य भर्ती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.