WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे ‘या’ जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर (Western Coalfield Limited Nagpur) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (WCL Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत किंवा उमेदवार ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करू शकतात. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –

– पर्यवेक्षक (Overseer (Civil) Gr. C)

– कायदेशीर निरीक्षक (Legal Inspector)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– पर्यवेक्षक (Overseer (Civil) Gr. C) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी 3 वर्षांचा सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक.

– कायदेशीर निरीक्षक (Legal Inspector) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी १० वी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच LLB पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक.

 

ही कागदपत्रे आवश्यक –

Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र, (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता – कोल इस्टेट, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2021

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1xJBbZw3YNMioXQ5fYOHMisQ07CdClWsS/view

अर्ज करण्यासाठी – http://westerncoal.in/?q=node/19

 

Web Title :- WCL Recruitment 2021 | western coalfield limited nagpur wcl recruitment 2021 openings for 40 posts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा