TikTok वर बंदी : ‘माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील सर्वाधिक पसंतीच्या टिकटॉक अ‍ॅपने फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागालाही वेड लावले होते. ग्रामीण भागातील लोकंही टिकटॉकवर स्टार झाले, इतकीच नव्हे तर बहुतेकांनी कमाईही केली. मात्र आता भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या स्टार्सवर संकट कोसळले आहे. अशाच स्टार्सपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील दिनेश पवार आहेत.

धुळ्यात राहणारे दिनेश पवार दोन बायकांसह टिकटॉक स्टार झाले. पवार आणि त्याच्या दोन पत्नी 90 च्या दशकातील बॉलीवूड गाण्यांवर डान्स करायचे. या व्हिडीओमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय त्यांनी 30 लाख रुपयांची कमाई केली. टिकटॉकवर बंदीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण आता उद्धवस्त झाल्याचे म्हटले आहे. आम्ही आता उद्धवस्त झालो, मात्र अशी परिस्थिती फक्त आमचीच नाही हे आम्हाला समजले आहे. माझ्या दोन्ही पत्नींनी ही बातमी पाहिली आणि त्या रडू लागल्या. आमच्यासारख्या लाखो लोकांना असंच दु:ख झाले असणार.

आता आम्ही युट्युबर आमचे व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टिकटॉकवर अनेक युवकांनी तर नोकरी सोडून असे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून त्यांना लाखोंची कमाईसुद्धा झाली आहे. या युवकांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या युवकांना अनेक कंपन्या स्पॉन्सरही करत आहेत. त्याचबरोबर त्यांना जाहिरातीसुद्धा मिळत आहेत. आता या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.