ZP तील पराभवानंतर देखील फडणवीसांनी दाखवलं ‘गणित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेवरही आपले वर्चस्व गाजवले आहे. अशातच भाजपच्या पराभवानंतरही फडणवीसांनी आपलं गणित दाखवला आहे. ज्या जिल्ह्यात नितीन गडकरी आणि फडणवीस यांचे प्रतिनिधित्व आहे त्याच नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपचा पराभव झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि अचानकपणे झालेल्या राजकीय घडामोडींनंतरच्या पहिल्याच सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका हा स्थानिक राजकारणाचा कल समजून घेण्यासाठी पुरेसा आहे. भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने स्वतंत्रपणे निवडणुका लढवून राष्ट्रवादीचे हे वर्चस्व पुसून टाकले होते. परंतु महाविकास आघाडीने पुन्हा तोच काल निकाल जाहीर झालेल्या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर प्रभाव दाखवून दिला आहे.

धुळे जिल्हा वगळता इतर पाचही जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. महाविकास आघाडीने उर्वरीत ४ जिल्ह्यांमध्ये तर अकोला जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाने वर्चस्व मिळवले आहे. जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समित्या, नगरपालिका किंवा महापालिका निवडणुकांचा कल हा राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या बाजूने असतो, असा संकेतच जिल्हा परिषद निवडणुकांमधून दिसला आहे. मात्र, तरीही भाजपाच एक नंबरचा पक्ष असं भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सहा जिल्ह्यांच्या पंचायत समितींच्या १९४ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. नागपूर, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदांचे पंचायत समितींचे निकाल बुधवारी जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या १०६ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. त्यामुळे आम्हीच १ नंबर असल्याचं फडणवीस यांनी म्हंटले आहेत. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहेत आणि विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/