आ. राहुल कुल हे दूरदृष्टी असलेले नेते, आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम : नामदेव ताकवणे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून त्यांच्यामुळे दौंडचा नक्कीच कायापालट होणार आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून माझा विरोध दादांना नव्हता आणि असणार ही नाही असे मत भाजपचे नेते आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नामदेवबापू ताकवणे यांनी व्यक्त केले. ते पिंपळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

मुळशी पाण्यावर राहुल दादांशिवाय कुणीच आवाज उठवला नाही हे त्रिवार सत्य सर्वांनी मान्यच करायला हवे असे बोलताना चौफुला येथे MIDC सुद्धा दादांच्या पाठपुराव्यामुळे येणार असून त्यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे आणि होतकरू तरुणांना संधी मिळणार असल्याचे सांगितले. कारखान्याबाबत बोलताना भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याला भाजपने मदत केली त्यामुळे तो टिकला पण विरोधकांनी मात्र टिका करण्यापलीकडे या कारखान्याला कुठलीच मदत केली नाही.

राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि सध्याचे उमेदवार रमेश थोरात हे फक्त टिका करण्यात धन्यता मानतात पण राहुल कुल यांच्यासारखे तालुक्याचे कुठलेच व्हिजन त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना निवडून देऊन दौंडच्या पदरात काहीच पडणार नसल्याने सुज्ञ जनता राहुल कुल यांना पुन्हा एकदा तालुक्यामध्ये निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like