‘वंचित’च्या ४८ जागा येऊ शकतात : प्रकाश आंबेडकरांना विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीच्या ४८ जागा राज्यात येऊ शकतात. एक्झीट पोलच्या आकड्यांवर मी बोलणार नाही. २३ तारखेपर्यंत वाट पाहू. चित्र स्पष्ट होईल. एक्झीट पोलने आम्हाला कुठेही गृहित धरलेलं नाही. त्यांचंही मत आम्हाला मान्य आहे. तर इव्हीएम हे इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे. कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिवाइस हॅक होऊ शकते. असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.

२३ तारखेपर्यंत वाट पाहू

२०१४ चा कॉंंग्रेसच्या भ्रष्टाचाराचा उच्चांक होता. सामान्यांमध्ये चीड होती. त्यामुळे राज्यात भाजपला ४२ जागा मिळाल्या तर इतर राज्यांमध्ये स्वीप केला. ते हिमालयावर पोहोचले. तेथे टिकणं हे सोपं नाही. ते खाली येणार. त्यांनी तेथे टिकतील असं काही केलेलं नाही. २३ तारखेला हे आकडे खरे आहेत की खोटे ते कळेल.

या महत्त्वाच्या जागा

माढा बारामती, नाशिक, नागपूर, भंडारा गोंदीया वर्धा या सगळ्या जागा महत्त्वाच्या आहेत. राज्यात वचिंतच्या ४८ जागा येऊ शकतात. एक्झिट पोलचंही मत मान्य आहे. असंही ते म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रूमेंट हॅक होऊ शकते. त्यामुळे इव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं मत त्यांनी मांडलं.

आम्ही अनालिसीस करू

एक्झीट पोलने आम्हाला कुठेच गृहित धरलेलं नाही. त्यामुळे निकालनंतर नेमकं काय होईल त्याचं आम्ही अनालिसीस करू. आमची काय चूक झाली. याचं अनालिसीस करू असं मत त्यांनी मांडलं.

इव्हीएममध्ये बिघाड नसेल तर…

इव्हीएम मशीनमध्ये गडबड नसेल तर उत्तरप्रदेशातील भाजपच्या किमान ४० जागा जातील. ते ज्या उच्चांकावर पोहोचले आहेत. ते स्थान टिकविण्यासाठी भाजपने काहीही केलेलं नाही. त्यामुळे त्यांना जनता नाकारेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like