विरोधकांना १५ वर्षात जमले नाही ते आम्ही ४ वर्षात केले : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला करता आला नाही एवढा विकास राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने गेल्या चार वर्षांत केला आहे. विरोधकांनी जाहीर व्यासपीठावर कामगिरीची तुलना करण्यासाठी समोरा-समोर यावे, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाली. बैठकीचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाने झाला. यावेळी ते बोलत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e09569f1-c2ce-11e8-a4be-e32a0f7ce6b5′]

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मतदारांशी वैयक्तिक संपर्क ही भाजपची ताकद असून कार्यकर्त्यांनी प्रत्येकाशी संपर्क साधून सरकारची कामगिरी पोहोचवली तरी २०१४ पेक्षा जास्त मते मिळवून केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालय बांधणी, घरबांधणी, स्वयंपाकाचा गॅस, वीज पोहोचवून कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन आणले. आयुष्मान भारत योजनेतून देशभरातील ५० कोटी लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळेल. विकास, चांगला कारभार, पायाभूत सुविधांचा विकास अशा कोणत्याच मुद्दय़ावर भाजप सरकारच्या समोर विरोधकांना उभे राहता येणार नाही, स्पर्धा करता येणार नाही म्हणून भ्रम पसरवण्याचे, खोटे आरोप करण्याचे काम विरोधकांनी सुरू केले आहेत. पण त्यामुळे कार्यकत्र्यांनी घाबरण्याचे कारण नाही.

[amazon_link asins=’B00CPG4RHO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eadd8e56-c2ce-11e8-84e7-bd3c57667f0e’]

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळालेले जवळपास दोन कोटी लोक महाराष्ट्रात आहेत. मागील निवडणुकीत दीड कोटी मते भाजपला मिळाली होती. आता या दोन कोटी लोकांपर्यंत पोहोचून भाजप सरकारमुळे त्यांना झालेल्या लाभाची आठवण करून दिली तरी ही सर्व मते भाजपला मिळतील. वैयक्तिक संपर्क हे आपले सामर्थ्य आहे हे लक्षात ठेवा, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना जनसंपर्कावर भर देण्याची सूचना केली.

महिला कंडक्टरच्या पतीकडून लाच घेताना डेपो मॅनेजरला अटक

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले तेव्हा ३२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. भाजप सरकारने ४ वर्षांत त्यात तब्बल १३ लाख हेक्टरची भर घातली. शुल्क नियामक प्राधिकरणाच्या माध्यमातून खासगी महाविद्यालयांची शुल्कवाढ नियंत्रित करून विद्याथ्र्यांचे ३ हजार कोटी रुपये वाचवले, कृषी खात्यातर्फे दरवर्षी अडीच हजार कोटी रुपये खर्च केले जात होते. भाजप सरकारने ती रक्कम ५५०० कोटी रुपयांवर नेली. काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षांत शेतकऱ्यांना थेट मदत ७ हजार कोटी रुपयांची केली होती. भाजपने ४ वर्षांत १६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. १५ वर्षांत केवळ ४५० कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले होते. भाजप सरकारने ४ वर्षांत ८२०० कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले, असे फडणवीस म्हणाले.