‘हा’ नेता करणार नाराज आठवलेंशी चर्चा

मुंबई : वृत्तसंस्था- भाजप आणि शिवसेनेने युती केल्यांतर जागा वाटपावरुन केंद्रीयमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले नाराज झाले आहेत. आठवले यांच्याशी चर्चा करुन त्यांची नाराजी लवकरच दूर करण्यात येईल असे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

युतीनंतर दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेसाठी जागा वाटप झाले आहे. मात्र, आठवलेंसह इतर मित्र पक्षाला जागावाटपात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे रामदास आठवलेंनी प्रसार माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. २०१४ च्या निवडणुकीत ज्या मित्र पक्षांनी साथ दिली त्यांचा सन्मान निश्चित करण्यात येईल. सर्व मित्र पक्षांसह महायुती होईल. या युतीच्या जोरावर विरोधकांना पुन्हा पराजीत करु असा विश्वास मुनगंटीवार यानी व्यक्त केला.

युतीच्या घोषणेनंतर वर्षा बंगल्यावर युतीच्या नेत्यांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जेवणातील पदार्थ तिखट आहेत, की गोड हे माहिती नाही. पण, शेवट नक्की गोड असणार, अशी सूचक टिपण्णी यावेळी मुनगंटीवार यांनी केली.