Latur News : देवणी तालुक्यातील सराफा व्यापार्‍याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील देवणी तालुक्यातील वलांडी येथे एका सराफा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.

पोलिसांकडून मिळालेली माहित अशी, वलांडी येथील बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दुकानाचे मालक बालाजी धोंडिंबा कलमे (वय, ४२, रा. कोनाळी) यांनी वलांडी येथे गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घरात गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या कोनाळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच मयत बालाजी कलमे यांनी मृत्युपुर्वी चिठ्ठी लिहून खिशात ठेवले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चिठ्ठीत आपण कोणाचे देणे नाही एवढेच लिहले आहे. त्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान, वलांडी बाजारपेठ बंद ठेवुन श्रध्दाजंली वाहण्यात आली. या प्रकरणी देवणी पोलिसात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.उपनिरिक्षक नारायण डप्पडवाड करत आहेत.