राहुल गांधी ‘समलैंगिक’ ! सावरकरांसंबंधित वादात ‘हिंदू महासभे’ची उडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस सेवा दलाच्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तिकेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधित असलेल्या आशयावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता हा वाद आणखी तापणार असे दिसत आहे. कारण आता यात अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रापाणी यांनी उडी घेतली आहे. आधीच सावरकर प्रेमींकडून काँग्रेस सेवा दल आणि काँग्रेसला लक्ष केले जात असताना आता अखिल भारतीय हिंदु महासभेने देखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रापाणी यांनी काँग्रेस सेवा दलच्या पुस्तिकेत उल्लेख असलेल्या गोडसे आणि सावरकर यांच्या शारीरिक संबंध होते यावर भाष्य केले आहे. स्वामी चक्रापाणी म्हणाले की महासभेच्या माजी अध्यक्ष असलेल्या सावरकरजींवर करण्यात आलेला हा आरोप निंदनीय आहे. आम्ही देखील राहुल गांधींबाबत असेच काही ऐकले आहे की ते समलैंगिक आहेत.

स्वांतत्र्यावीर सावरकर यांच्यावर काँग्रेस सेवा दलाकडून वादग्रस्त आशय छापण्यात आल्याने हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. या वादाला आता हिंदु विरुद्ध काँग्रेस असे वळण मिळण्याची शक्यता सोशल मीडियातून वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांनी या पुस्तकात देण्यात आलेल्या विधानांची पाठराखण केली. ते म्हणाले की सावरकर नक्की काय आहेत हे देशासमोर आले नाही. सावरकरांचे वास्तविक चित्र या पुस्तकातून मांडण्यात आले आहे, हे वास्तव मांडताना आम्ही त्यांच्यासंबंधित संशोधन केले आहे. सावरकरांचे वास्तव या पुस्तकांच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/