शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, म्हणाला – ‘आम्ही भारताला अनेकदा हरवलंय’

पोलिसनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर शाहिद आफ्रिदी सोशल मीडियावर सक्रीय झाला आहे. काश्मीर आणि भारत सरकारविरोधी वक्तव्यामुळे आफ्रिदीला भारतीय नेटकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली होती, यामधून सावरत असताना त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाची खोडी काढली आहे. पाकिस्तानी संघाने भारताला अनेकदा हरवले आहे. त्यामुळे सामना संपल्यानंतर आम्हालाच जरा वाईट वाटायचे आणि आम्ही त्यांची माफी मागायचो, असे त्याने म्हटले आहे.

भारताविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्यात केलेली 141 धावांची खेळी ही आपल्यासाठी संस्मरणीय खेळी ठरल्याचे आफ्रिदीने सांगितले होते. या सामन्यातत पाकिस्तानने भारतावर 12 धावांनी मात केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर असणे आवश्यक असते. प्रत्येक सामन्याच चाहत्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात, प्रत्येक सामन्यात तुम्ही चांगली कामगिरी करावी अशी त्यांची अपेक्षा असते. भारताविरुद्ध खेळायला मला नेहमी आवडते. आम्ही अनेकदा भारतीय संघाला हरवले आहे, आम्ही त्यांना इतक्या वाईट पद्धतीने हरवायचो की नंतर आम्हालाच वाईट वाटायचं आणि सामना संपल्यानंतर आम्ही त्यांची माफी मागायचो. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरोधात खेळताना नेहमी आपला कस लागल्याचे त्याने सांगितले. गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी हल्ल्यामुळे देत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवली जात नाही.