राजकीय पक्षांनी ईव्हीएम (EVM) चा ‘फुटबॉल’ केला : मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्याने EVM चा मुद्दा पुन्हा चर्चेत येऊ लागला आहे. या मुद्यावर निवडणूक आयोगानेही वारंवार स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, हा मुद्दा पुन्हा उपस्थित होत असतो. या प्रकरणात मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी सर्वच राजकीय पक्षांना फैलावर घेतले आहे. सर्वच पक्षांनी EVM चा फुटबॉल केला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीत झालेल्या पत्राकर परिषदेत सुनील अरोरा बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी जोरात सुरु केली आहे. तारखांची घोषणा केव्हा होईल यावर मात्र त्यांनी काहीही माहिती दिली नाही. मात्र, आठवड्याभरात तारखांची घोषणा होऊ शकते अशी शक्यता आहे.
राजकीय पुढारी किंवा पक्ष निवडणुकीत हारल्यानंतर EVM ला दोषी ठरवतात. मात्र तोच पक्ष जेव्हा जिकतो तेव्हा त्यांना EVM बाबत काहीही आक्षेप नसतो. गेली अनेक वर्ष EVM चा वापर सुरु आहे. काही किरकोळ अपवाद वगळता EVM मशिन्स अतिशय चांगले काम करत आहेत असेही त्यांनी सांगितले.