अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर अमित शहांसोबत चर्चा झाली होती : शिवसेना

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत 50-50 असे माझ्यासमोर ठरले नव्हते. तसेच अमित शहा यांच्यासोबत ठरले असेल तर आपल्याला माहित नाही असे सांगितले. यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री निवासस्थानी जी चर्चा झाली होती त्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा होता असे राऊत यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदे दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधून फडणवीस यांनी केलेले सर्व दावे फेटाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा यांच्यावर कधीही व्यक्तिगत टीका शिवसेनेने केलेली नाही, असेही राऊत यांनी नमूद केले. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आलेले नाही, असे नितीन गडकरी यांनीही म्हटले आहे. त्याकडे लक्ष वेधले असता मातोश्री निवासस्थानी युतीची चर्चा झाली तेव्हा गडकरी तिथे नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मतभेद असलेल्या पक्षांच्या मांडीला मंडी लावून भाजप सत्तेत
निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे धक्कादायक विधान केले होते. शिवसेना भाजपसोबत चर्चा करत नाही मात्र ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध निवडणुका लढलो त्यांच्यासोबत रोज चर्चा करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला, त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी इतिहासाकडे बोट दाखवले.

अनेक राज्यांत विचार जुळत नसलेल्या व पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या पक्षांसोबत भाजपने मैत्री केल्याची उदाहरणे आहेत. राम मंदिर, कलम 370 या मुद्यांवर मतभेद असलेल्या पक्षांच्या मांडीला मांडी लावून भाजप सत्तेत बसले असल्याचा पलटवार राऊत यांनी केला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like