उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, राज्यात सध्या 1 मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. तरी देखील कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्व मंत्र्यांनी राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन जाहीर करावा अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली असून मुख्यमंत्री त्याबाबत घोषणा करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून संपुर्ण लॉकडाऊन घोषित केला जाणार असून त्याबाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाऊ शकते. आरोग्यमंत्र्यांनी थोडक्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन असणार आहे असे सूचित केले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज किंवा उद्या राज्यातील संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनबाबतची नियमावली तयार करण्याचं काम चालू असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता मात्र राज्यात संपुर्ण कडक लॉकडाऊन लागणार असं आता स्पष्ट झालं आहे. लॉकडाऊन हा 15 दिवसांचा असावा अशी मागणी देखील अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.