170 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळं मुख्यमंत्री शिवसेनेचाच, ‘या’ बडया नेत्यानं ठासुन सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा करत शिवसेनेला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे ठामपणे सांगितले. रविवारी (दि.3) सकाळी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असल्याचा दावा करत 170 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहीती दिली. तसेच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावर होईल असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) आणि इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडे 170 पर्यंत जाईल असा विश्वास संजय राऊत यांना आहे.

भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं

सत्ता स्थापनेचा मुहुर्त लांबणीवर पडत असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर आरोपांचा बॉम्ब टाकला आहे. ईडी, सीबीआयच्या मदतीने ज्यांनी सरकारं बनवली. ते त्यांच्यावरच उलटलं आहे. सध्या तुरुंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून याच गुंडागर्दीचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. त्यांनी नाव लवकरच जाहीर करु, पण भाजपचे राजकारण गुंडाच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झाले आहे, हे महाराष्ट्रात चालणार नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

…तशी हिंमत एकदा करुन पाहाविच

राष्ट्रपती राजवट लादण्याची हिंमत भाजपाने एकदा करून पाहावीच, असं म्हणत भाजपाला सामनातील रोखठोक या सदरातून डिवचलं आहे. वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. तसेच रथाचे चाक अडकले आहे व भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत ? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.