सकाळी उठल्यानंतर करा ‘ही’ कामे, दिवस जाईल आनंदात

पोलीसनामा ऑनलाईन – काळची सुरुवात चांगली झाली तर दिवस छान जातो. याच कारणामुळे सकाळी उठल्यानंतर आपले विचार सकारात्मक होतील अशी काही कामे करावीत.
तसेच सकाळी उठल्यानंतर आपण काही महत्वपूर्ण कामे केली तर आपला दिवस चांगला जाईल. त्यामुळे आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपण सकाळी उठल्यावर कोणते काम करावे ते जाणून घ्या.

१) सकाळी झोपेतून उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यासाठी रात्रीच तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. हे पाणी दररोज प्यायल्यास पोटाशी संबंधित विविध आजार दूर होतात. गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या नष्ट होतात. हे काम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

२) दीर्घ काळापर्यंत निरोगी आणि तरुण राहण्यासाठी योग-ध्यान सर्वश्रेष्ठ उपाय आहे. योगाने शरीरातील सर्व प्रकारचे आजार नष्ट होण्यास मदत होते आणि ध्यानाने मानसिक शक्ती वाढते. ध्यानाने क्रोधावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते तसेच मानसिक तणाव नष्ट होतो. योगाने शरीर ताकदवान बनते. रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. सकाळी केलेले योग-ध्यान सर्वोत्तम राहते.

३) दररोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही आणि साखर अवश्य खावी. हा शुभ शकुन मानला जातो. या उपायाने कामामध्ये यश प्राप्त होते तसेच नकारात्मकता नष्ट होते.

४) दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीच्या रोपट्याची ही छोटीशी सेवा केल्याने देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, ज्या घरांमध्ये तुळस असते आणि जे लोक तुळशीला जल अर्पण करतात त्यांना सुख-समृद्धी प्राप्त होते.