आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाकडे लक्ष द्यावे : मंत्री डॉ. अशोक उईके

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. आरोग्य, महिला व बालविकास विभाग आणि आदिवासी विकास विभागाने संयुक्तपणे अभियान राबवीत या विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज दिले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीतीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक व प्रकल्प अधिकारी धुळे, यावल यांच्यासमवेत तसेच विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी यांच्यासमवेत खर्चाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डी. एस. अहिरे, आमदार काशिराम पावरा, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., नगरसेवक बबनराव चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, प्रकल्पाधिकारी राजाराम हळपे आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा, वसतिगृहात अधिक्षकांनी निवासी वास्तव्य केले पाहिजे. त्याचा प्रकल्पाधिकारी यांनी वेळोवेळी पाहणी करुन आढावा घ्यावा. जे अधीक्षक निवासी राहणार नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करावी. आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थी- विद्यार्थिंनीसाठी मूलभूत सोयी सुविधा पुरवाव्यात. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. तसेच आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहासाठी जागा उपलब्ध नसेल, तर अशा शाळा व वसतिगृहे तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळवून द्यावा. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा, असेही त्यांनी निर्देश दिले. यावेळी मंत्री डॉ. उईके यांनी शालेय शिक्षण, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना, महिला व बालकल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, कृषी विभाग, वनविभाग, आदिवासी विकास विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजनेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार श्री. अहिरे, आमदार श्री. पावरा, डॉ. तुळशीराम गावित, डॉ. जितेंद्र ठाकूर, मोहन सूर्यवंशी, लीलावती सूर्यवंशी आदींनी सहभाग घेत आदिवासी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान