‘आम्ही त्याला खूप वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…’, कबीर बेदींचा मुलाच्या आत्महत्येवर मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते कबीर बेदी यांचे ‘Stories I Must Tell: The Emotional Life of an Actor’ हे आत्मचरित्र प्रकाशित होण्यापूर्वीत चर्चेत आले आहे. या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या परवीन बाबीसोबतच्या अफेअरपासून ते मुलगा सिद्धार्थच्या आत्महत्येपर्यंत घडलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

नुकतेच कबीर यांनी एका वृत्तवाहिनीला या पुस्तका संदर्भात मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुलगा सिद्धार्थच्या आत्महत्येवर वक्तव्य केले आणि म्हणाले, ‘सिद्धार्थ अतिशय हुशार मुलगा होता. पण एक दिवस अचानक त्याचे गोष्टींचा विचार करणे बंद झाले. त्याला आम्ही अनेकदा सजवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आम्ही Montreal गेला होता. तेथे त्याला रस्त्यावर रागात पाहिले. तेव्हा त्याला सांभाळायला आठ पोलीस पुढे धावून आले. तेथील डॉक्टरांनी त्याला सीजोफ्रेनिया नावाचा आजार झाल्याचे सांगितले’.

पुढे ते असं देखील म्हणाले कि, ‘सिद्धार्थला बरं करण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करत होते. आम्ही त्याला वाचवण्यासाठी अफाट प्रयत्न केले होते. पण तो आम्हाला सोडून निघून गेला.’ सिद्धार्थने वयाच्या २५व्या वर्षी आत्महत्या केली. आजही कबीर हे मुलाच्या आठवणीत भावूक होतात. त्यांनी त्यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या पुस्तकात खासगी आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींबाबतचे खुलासे केले आहेत.

कबीर यांनी परवीन दुसांझशी लग्न केल्यानंतर तिला नाव बदलन्यास सांगितले होते. कबीर म्हणाले, ‘मी म्हटले होते माझ्या आयुष्यात यापूर्वी ही एक परवीन होती. त्यामुळे जर तुला वाईट वाटणार नसेल तर तू तुझे नाव बदलू शक्तीस जेणे करुन लोकांचा गोंधळ होणार नाही. त्यावर उत्तर देत परवीन मला म्हणाली तुझी हिंमत कशी झाली माझे नाव बदल हे देखील विचारण्याची?’