“सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने आघाडीला काही फरक पडणार नाही”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे आघाडीला काही फरक पडणार नाही असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ता रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे उपस्थितीत उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथील गरवारे हॉलमध्ये पार पडला. त्यांच्या भाजप प्रवेशाने नगर मधील दोन्ही जागा भाजपच्याच होतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता.

त्यावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील भाजपात गेल्याने आघाडीला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. राजू शेट्टी हातकणंगले, वर्धा आणि बुलढाणा या लोकसभा जागांसाठी आग्रही आहेत. हातकणंगलेची गेल्या दहा वर्षांपासून आमच्याच ताब्यात आहे. त्यामुळे आघाडीने ती जागा आम्हाला देत असल्याचे सांगू नये, असं म्हणत आघाडीवरील नाराजी बोलून दाखवली.

तसंच वर्धा आणि बुलढाणा या ठिकाणीही स्वाभिमानीला जागा मिळावी अशीही मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. आम्ही यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन दिवसांची मुदत दिली आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही किमान १६ जागांची यादी जाहीर करू असाही पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.