शिवसेनेचे खा. संजय राऊतांनी ‘कमी’ बोलावे हीच आमची इच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या संजय राऊत यांची विचारपूस करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. संजय राऊत यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असून त्यांना कमी बोलण्यास सांगितले आहे आणि आमचीही तशीच इच्छा आहे कारण त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी ते गरजेचे असल्याचे मत आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

सकाळीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील रुग्णालयात येऊन संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्या पाठोपाठ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील रुग्णालयात राऊत यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र त्यानंतर लगेच आशिष शेलार हे देखील भेटीसाठी आले. यावेळी शेलार आणि ठाकरे यांची भेट थोडक्यात चुकली.

महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे संजय राऊत यांना भेटायला आलो असल्याचे शेलार यांनी सांगितले तसेच यामागे कोणतेही राजकीय कारण नव्हते हे देखील त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांची तब्बेत लवकरात लवकर सुधारावी आणि ते बरे व्हावेत असा आशावाद देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.

‘हम होंगे कामयाब’ संजय राऊत यांनी रुग्णालयातून केले ट्विट

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like