‘भाजप सोबतच्या युती सरकारमध्ये शिवसेनेला दिली गेली ‘गुलामा’सारखी वागणूक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत राहणारे शिवसेना खासदार संजय राऊत Shiv Sena MP Sanjay Raut यांनी भाजपावर BJP हल्लाबोल केला आहे. त्यांनी शनिवारी जळगावमध्ये Jalgaon एका कार्यक्रमात म्हटले की, महाराष्ट्रात जेव्हा भाजपा BJP आणि शिवसेनेचे युती सरकार होते तेव्हा भाजपाने शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली होती. सरकारमध्ये शिवसेनेला महत्व न देता भाजपाला शिवसेना संपवायची होती.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

शेतकरी बांधवांनो पेरणी करताय ? थोड थांबा, कृषी विभागाने केले ‘हे’ आवाहन, म्हणाले…

भाजपाकडून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न
त्यांनी म्हटले की, मागील सरकारमध्ये शिवसेनेला महत्व दिले गेले नव्हते आणि गुलामांसारखी वागणूक दिली जात होती. शिवसेना संपवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुद्धा करण्यात आले होते. आमच्या समर्थनाने मिळालेल्या ताकदीचा वापर आम्हालाच संपवण्यासाठी करण्यात आला. जरी शिवसेनेला काही मिळाले नाही तरी सुद्धा आम्ही गर्वाने म्हणू शकतो की, राज्याचे नेतृत्व शिवसेनेच्या हातात आहे.

पाच वर्षासाठी ठाकरेच मुख्यमंत्री
रविवारी नाशिकमध्ये राऊत यांनी म्हटले की, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्री राहतील. राऊत यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी नुकतीच पीएम मोदी PM Modi यांच्याशी एकट्याने भेट घेतली होती, ज्यानंतर राजकीय शक्यता वर्तवल्या जात आहेत. काँग्रेस Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. राऊत यांनी यावर म्हटले की, सीएम पदाची इच्छा चुकीची नाही परंतु शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष राहणार आहे.

 खुशखबर ! परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या

जळगावमध्ये आम्ही मजबूत
जळगावच्या राजकारणावर त्यांनी म्हटले की, शिवसेना या जिल्ह्यात मजबूत आहे, येथे होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसैनिक मानसिक प्रकारे तयार आहे. आम्ही येथे नगरपरिषद, जिल्हा परिषद, विधान परिषद आणि लोकसभा आमच्या बळावर जिंकू. जळगावमधून शिवसैनिक आमदार, महापौर बनले, आता शिवसैनिकांना आशा आहे की, खासदार सुद्धा शिवसेनेचाच असावा. त्यांनी म्हटले की, ते याबाबत उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांना सांगतील.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : we were treated like slaves in alliance with bjp says shivsena leader sanjay raut 

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा