Lockdown 5.0 : मध्यप्रदेशात 15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात देखील कोरोनाचा हाहाकार चालू आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारनं 25 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला. सध्या लॉकडाऊन 4.0 चालू असून तो 31 मे रोजी संपत आहे. त्यानंतर देखील लाकडाऊन वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. पण, हॉटस्पॉट सोडून इतर ठिकाणी काही सूट देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारचा निर्णय येण्यापुर्वीच मध्यप्रदेश मधील राज्य सरकारनं 15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे.

1 जून नंतर लॉकडाऊन 5.0 सुरू होणार आहे. त्यामध्ये काय सवलती दिल्या जाणार हे मध्यप्रदेश सरकारकडून सोमवारनंतर जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. सध्या तरी मध्य प्रदेश सरकारनं 1 जून नंतर 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवला आहे.