शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ‘या’ 3 वक्तव्यांमुळे आले ED च्या रडारवर ?

पोलिसनामा ऑनलाइन – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी छापा टाकून व्यवसायिक व्यवहारांबाबत त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची तास चौकशी केली. हे जेव्हा छापा टाकला त्यावेळी प्रताप सरनाईक परदेशात होते त्यांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर देशातून तात्काळ प्रभादेवी येथे शिवसेनेच्या मुखपत्रात च्या कार्यालयात जाऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. तसंच आज पूर्ण दिवस विहंग आणि प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश आहेत.

राजकीय दबावतंत्रसाठी ईडीचा वापर करण्याचे दिल्लीतील भाजप सरकारचे तंत्र आता सर्वांना समजले आहे. बळाचा वापर केला तरीही राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. कारवाई का केली हे अद्याप आम्हाला समजलेले नाही. काही माहिती समजल्यास कायदेशीर लढाई लढू, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

प्रताप सरनाईक यांनी केलेलं वक्तव्य
प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांपासून टार्गेट केलं होतं. तसंच कंगना ड्रग्स घेत असेल तर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील प्रताप सरनाईक यांनी केली होती. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. अर्णब गोस्वामीच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आणि गोस्वामी यांना अटक झाली. नाईक प्रकरण भाजपाने जाणीपूर्वक दाबल्याचा आरोप देखील सरनाईक यांनी भाजपावर केला होता. परिणामी यामुळेच प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाली अशी भावना शिवसेनेत आहे.

मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला होता. नरेंद्र मेहता यांच्यासारखे मातब्बर आमदार तेथे भाजपाचे प्रतिनिधित्व करीत होते भाजपच्या गीता जैन यांनी मेहता मेहता यांचावर मात दिली अपक्ष विजयी झालेल्या जैन यांनी शिवसेनेत प्रवेश करावा याकरिता प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केले व त्यांना सेनेत आणून मीरा-भाईंदर मध्ये शिवसेना मजबूत केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपद प्राप्त झालं होतं. तीन आमदार होऊनही एका जिल्ह्यात किती मंत्रीपद द्यायची या निकषामुळे सरनाईक यांची संधी हुकली होती.

एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे प्रताप सरनाईक विश्वासू सहकारी होते. मात्र त्यांच्यात गेली काही वर्षे त्यांची राजकीय वैर निर्माण झाले होते. मात्र म्हाडाच्या वर्तकनगर येथील घरांच्या प्रकल्प निमित्ताने प्रताप सरनाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी असलेले जुने वैर संपुष्टात आणले. आता पुन्हा प्रताप सरनाईक यांची राजकीय चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे.

चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस
चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. राज्य सरकारने ईडीची वाट न पाहता, यांच्याकडे असलेली सीडी काढावी.

सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार- खासदार संजय राऊत
कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकासआघाडीचे सरकार मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरु केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री आमदार यांच्या घराबाहेर ईडीने कार्यालय थाटली. तरीही आम्ही घाबरत नाही एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे ईडी काम करते आहे.

ठाण्यातील नेत्यांचे मौन
सर प्रताप सरनाईक यांच्या निवास्थानी ईडीचे पथक पोचल्यानंतर संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दात केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. याबाबत सेनेचे सर्वोच्च नेते तसेच ठाण्यातील प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रताप सरनाईक यांची शिवसेना आता कमी पाठराखण करणार? कारवाई राजकीय हेतूने असल्यास त्यांना ती राजकारणात फलदायी ठरणार का याची शिवसैनिकांत याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.