आम्ही पुणेकर, करणार नाही हॉर्नचा वापर : २९वे रस्ता सुरक्षा अभियान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आणि पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून २९ वे रस्ता सुरक्षा अभियान २०१८ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चालकांमध्ये हॉर्न वाजविण्याच्या सवयीबाबत जनजागृती करण्यात येत असून हॉर्न वाजविण्याचे दुष्परिणाम आणि फायदे याची माहिती चालकांना करून देण्यात येत आहे.

विनाकारण हॉर्न वाजविल्याने अनेक दुष्परिणामांना सर्वांनाचा सामोर जावे लागते. यासाठी रस्ता सुरक्षेत हॉर्नच्या वापराला अतिशय महत्व आहे. वाहन चालवताना हॉर्नचा वापर कधी करावा यासाठी काही नियम, अटी आहेत. मात्र, पुण्यासारख्या शहरात या नियमांचे मोठ्याप्रमाणात उल्लंघन होत असते. विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहन चालकांची संख्या मोठी आहे. या सवयीमुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. विनाकारण हॉर्न वाजवल्यामुळे मानसिक ताण, उच्च रक्तदाब, ह्दयरोग, कायमचा बहिरेपणा, वृद्ध, बालक आणि रूग्णांमध्ये घबराट निर्माण होणे, धोकादायक वाहन चालविण्याने अपघात घडणे, अपघातसदृश्य स्थिती निर्माण होणे, मानसिक नैराश्य येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे वाहन चालकांनी विनाकारण हॉर्न वाजविणे टाळले पाहिजे, असे आवाहन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व पुणे आरटीओने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत केले आहे.
[amazon_link asins=’B018QV0H48,B000CRZXPI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a38bae25-b253-11e8-b9c3-1bb6ed13195c’]
हॉर्न नॉट ओके प्लिज, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. हॉर्न न वाजविल्याने कोणते फायदे होतात हेदेखील अभियानातून वाहनचालकांना सांगण्यात येत आहे. हॉर्न न वाजविल्यास अत्यंत सुरक्षित ड्रायव्हिंग, सुरक्षित रस्ते प्रवास, तणावमुक्त ड्रायव्हिंग, वाहतूकीच्या नियमांचे पालन, नियंत्रित वेग, मानसिक शांतता, ध्वनी प्रदुषणास आळा व आनंददायक प्रवास असे फायदे वाहनचालकाला होतात, अशी जनजागृती या अभियानातून करण्यात येत आहे.

आवाज उठवा, गोंगाट संपवा, हॉर्न दुसऱ्याला ऐकू येण्यासाठी असतो त्याला बहिरे करण्यासाठी नाही, सतत हॉर्न वाजविणे कायद्याने गुन्हा आहे, आम्ही पुणेकर करणार नाही हॉर्नचा वापर, नको हॉर्न हवी सुरक्षा, ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका, हॉर्न वाजविणे आरोग्यास अपायकारक, आपल्याला हॉर्न वाजविण्याचा आजार आहे का? हॉर्न रस्ता सुरक्षेसाठी आहे, वाहन चालवताना तुम्ही हॉर्नचा सतत वापर करता का, मग तुमच्या ड्रायव्हिंगमध्ये तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी सुधारणा करण्याची गरज आहे, असे आवाहन या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत घोषवाक्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

चिरीमिरी घेणारे वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी निलंबित

जाहिरात