सरकारने CAA कायदा मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, यशवंत सिन्हांचा ‘इशारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी नागरिकत्व संशोधन कायदा गैरसंवैधानिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की नागरिकत्व संशोधन कायदा गैरसंवेधानिक आणि काळा कायदा आहे. या कायद्याविरोधात आम्ही गांधी शांती यात्रा महाराष्ट्रातून सुरु केली आहे. ही यात्रा भारताच्या विविध राज्यातून जाऊन दिल्लीत राज घाटावर जाईल. सरकारने सीएए कायदा मागे घ्यावा अन्यथा आम्ही राजघाटवर आंदोलन सुरु ठेवू अशा इशाराच यशवंत सिन्हा यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला.

पुण्यात गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, तसेच गांधीभवनचे प्रमुख डॉ. कुमार सप्तर्षी उपस्थित होते.

राष्ट्रमंच, फ्रेंड ऑफ डेमॉक्रसी, शेतकरी जागर मंच या संघटनांकडून गांधी शांती यात्रा काढण्यात आली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून या यात्रेला सुरुवात झाली. आज ही यात्रा पुण्यातील गांधी भवनात आली होती. यावेळी सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यशवंत सिन्हा म्हणाले की देशात आज अशांती आहे. सीएएच्या या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. नागरिकांमध्ये नाराजी आहे. युवक कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. देशातील विद्यापीठे आंदोलनाची केंद्र बनली आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे दमन भाजपशासित राज्यात होत आहे. गांधींच्या विपरित विचारांवर सरकार काम करत आहे. त्यामुळे आम्ही ही पदयात्रा काढत आहोत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/