हडपसर मतदार संघातील ‘या’ समस्या सोडविणार म्हणजे सोडविणारच : मनसेचे वसंत मोरे

हडपसर : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी कात्रज प्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीत आम्ही अमोल कोल्हेंना पाठिंबा दिला होता. त्यांचे काम आम्ही केले होते. मात्र, विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने मोठे मन करून पाठिंबा दिला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हडपसर मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक, पाणी आणि कचरा या समस्या रोजच्याच आहेत. या समस्यांतून नागरिकांची सोडवणूक करण्याचा निर्धार आपण केला आहे. तसेच या प्रश्नावर महापालिकेत अनेकवेळा प्रश्न उपस्थित करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदार आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच कात्रजचा जसा विकास करून कायापालट केला तसा कायापालट मतदारसंघाचा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांवर निशाणा साधताना वसंत मोरे म्हणाले, निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आम्ही जोमाने प्रचार केला. आमच्या प्रचाराचा धडाका पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी रोज मतदारसंघात फिरून मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. घराघरात आम्ही पोहचलो आहोत. आमच्या पदयात्रेमध्ये नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामुळे हडपसर मतदारसंघामध्ये मनसेचा विजय निश्चित आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाल्याने त्याचाही फायदा मला होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

हडपसरमध्ये वाहतूकीची समस्या खूप मोठी आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना तासनतास उभे रहावे लागते. वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. विद्यमान आमदारांनी या समस्येवर कोणतीही उपाययोजना केली नाही. आपण आमदार झाल्यानंतर प्राधान्याने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पक्षाचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी कोंढवा परिसरात केलेल्या कामाचा फायदा आपल्याच होणार असल्याचे सांगत, मुढवा, माजरी, साडेसतरानळी, महादेववाडी, महमदवाडी परिसरातून चांगली मते मिळतील असा दावा त्यांनी केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like