इंदापूर तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविणार : राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर

पोलीसनामा ऑनलाईन : सुधाकर बोराटे – इंदापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचे आनेक प्रश्न प्रलंबित आहेत, मात्र हे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले परंतु त्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. इथुन पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना जे जे सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असुन पत्रकारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले..

सोमवार दिनांक ६ जानेवारी, आद्य दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदीनी इंदापूर तालुक्यातील विविध सामाजीक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधीकारी यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर येथिल पंचायत समिती अल्पबचत सभागृृृहामध्ये पत्रकार दीन व तालुक्यातील पत्रकार बांधव यांचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रदीप गारटकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके,इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल,शिवसेनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष नितीन शिंदे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ चंदनशिवे,रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश गणबोटे वसंतराव माळुंजकर,नगरसेवक अनिकेत वाघ, युवक नेते महेंद्र रेडके,श्रीधर बाब्रस,युवक नेते दीपकराव जाधव,शेखर पाटील,काँग्रेसचे नेते काकासाहेब देवकर,अमोलराजे इंगळे,धरमचंद लोढा,ज्ञानदेव डोंबाळे,प्रशांतदादा सिताप, हरिदास हराळे यांचेसह आनेक माण्यवर उपस्थित होते. तर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना गारटकर म्हणाले की, चांगले वार्तांकन केले तर संबंधित पत्रकाराचा दबदबा आदरयुक्त जनतेला राहतो. यातून सामाजिक प्रश्न सुटले जातात त्याचाच आनंद मिळतो. तसा दुसऱ्या कामातून मिळत नसतो म्हणून सामाजिक जाणिवेतून पत्रकारिता समाजाचे दुःख दूर करू शकते हे जनतेला माहिती आहे त्यामुळे डिजिटल जमान्यात देखील वृत्तपत्राचे अस्तित्व कायम राहिले आहे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये स्तुत्य उपक्रम राबवले जातात आनंदाची गोष्ट आहे असेही गौरवोदगार प्रदीप गारटकर यांनी काढले.

पत्रकारितेमध्ये तेवढी ताकत आहे की कोणतेही राजकर्ते एकमेकात जमो न जमो यांना एकत्र आणण्याची किमया बातमीदारीतुन केली जाते. पत्रकार बांधवांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी कायम सहकार्य लाभेल अशी माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.यावेळी इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार,तसेच इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयराव परीट,व इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्यासह तालुक्यातील सर्व व शासकीय अधिकाऱ्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी वृृत्तपत्र विक्रेते भीमाशंकर जाधव, महेशराव स्वामी,यांचा पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तर प्राध्यापक सुनील मोहिते यांचे धाडशी पत्रकारिता या विषयावर व्याख्यान पार पडले. यावेळी नानासाहेब चांदणे,ज्ञानेश्वर रायते, नितीन चितळकर,सुधाकर बोराटे, संभाजी रणवरे,सचिन खुरंगे,सोमनाथ ढोले,उदयसिंह जाधव,इम्तिहाज मुलानी,महेशराव स्वामी,गोकुळ टंगसाळे,आदम पठाण,बाळासाहेब सुतार,लक्ष्मणराव भिसे,भारत शेडगे,विजय शिंदे,शिवाजी पवार,कैलास पवार,गुरगुडे अमोल यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार ज्ञानेश्वर रायते यांनी केले तर आभार सोमनाथ ढोले यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/