रेशनिंगचा योग्य वाटप न झाल्यास दुकानदारावर अ‍ॅक्शन घेणार : जिल्हा सरचिटणीस चेतनसिंह पवार

मुरबाड पोलीसनामा रिपोर्टर अरुण ठाकरे – सर्वत्र लॉक डाऊन परिस्थिती रेशनीग दुकान दारांनी काळाबाजार सुरु असल्याचे समजताच मुरबाडचे पुरवठा शाखेचे नायब तहसिलदार बंडु जाधव यांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिधावाटप योग्य पध्दतीने व्हावा यासाठी काॅंग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी निवेदन दिले. रास्तभाव धान्य दुकानदार पुरवठा योग्यरितीने करत नसुन साठेबाजार करून काळाबाजार करत असल्याची चर्चा नागरिंकामध्ये आहे तर काही दुकानदार हे उध्दटपणे वागत असुन माल आला नाही किंवा उशीरा येणार आहे अशी उडवाउडवीची उत्तरे देवुन संभ्रमित करत असल्याचे जाणवले आहे.

भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातुन तांदुळ घेताना तो उच्च दर्जाचा असला पाहिजे तसेच दिल्ली सरकार च्या धर्तीवर घरपोच धान्य जर देवु शकलो तर गर्दी टाळता येवु शकते.नेहमीच्या काळात होणारा पुरवठा व मोफत होणारा तांदुळाचा पुरवठा योग्य पध्दतीने तीन महिने कालावधी व्हावा त्यात कुठेही दुकानदार, कमर्चारी अथवा अधिकारी जर अडथळा आणला जर त्यासंदर्भात तक्रार नागरिकांना करुन आली तर काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यक्षात दुकानात जावुन योग्य ती कार्यवाही करतील व त्यानंतर उध्दभवलेली परिस्थितीला आपला विभाग जबाबदार असेल अशी सुचना वजा विनंती चेतनसिंह पवार यांनी केली.